Marathi Barakhadi | मराठी बाराखडी | वाचन पुस्तिका PDF
वाचक मित्रांनो तुम्ही मराठी भाषा शिकतांना किंवा बोलतांना पाहिलं असेल कि मराठी भाषा ही अतिशय सुंदर भाषा आहे. मराठी भाषा ही सौंदर्याची खाण आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
मराठी भाषेचे विविध पैलू आपल्याला तिच्या लेखनात व वाचनात दिसून येतात.
मराठी भाषेत लहान-थोरांना त्याचा मान-सन्मान दिला जातो, जसे कि आपण पाहतो अहो, काहो, जाओ, कारे, तुरे, तू, तुम्ही, तुम्हाला, नको, नका, हवे, घ्यावे इत्यादी-इत्यादी. एवढं सर्व सन्मानजनक आपल्याला इतर भाषेत दिसून येत नाही हो? इंग्रजी सारख्या भाषेत तर प्रत्येक व्यक्तीला “You” (यु) म्हणून संबोधले जाते. म्हणजे इंग्रजी भाषेत कोणालाही तुचं म्हणतात मग तो व्यक्ती वयाने लहान असो किव्हा थोर असो. परंतु मराठी भाषेत मात्र असे कुठेच दिसून येत नाही. मराठी भाषा ही ज्याचा त्याला मनच देते. मग तो वयाने व्यक्ती कुठल्याही का असे ना.
दैनदिन जीवनात आपण सगळे बोलत असताना कळत- नकळत कितीतरी अक्षर, शब्द, वाक्य, परिच्छेद बोलून जातो. हे आपल्या कधी लक्षातही राहत नाही.
आपण कधीही कुठलाही, कसलाही विचार करत नाही कि आपण जे काही बोलतो, वाचतो किंवा ऐकतो त्या सर्वाचे मूळ कुठे आहे? मराठी भाषा ही कशी बनली? तिची उत्पत्ती काय? किंवा मराठी भाषा ही एवढी सुंदर भाषा कशी का आहे? आहे तर ती कशी आहे? आपण या सर्व बाबींचा विचार कधीही करत नाही किव्हा आपल्या मनात असे कधीच येत नाही.
मित्रानो, म्हणूनच आम्ही या ब्लॉग पोस्ट मध्ये मराठी भाषेचे मूळ (base) म्हणजेच मराठी बाराखडी होय.
हीच ती मराठी बाराखडी | Marathi Barakhadi ज्यामुळे अक्षरे, जोडाक्षरे, काना ा, र्हस्व-दीर्घ वेलांटी ि ी, र्हस्व-दीर्घ उकार ु ू, एक, दोनमात्रा े ै , एक, दोन काना आणि मात्रा ो ौ, अनुस्वार ं, विसर्ग ः म्हणजेच हे सर्व मिळून शब्द बनले आहेत व त्याच विविध शब्दांनी मिळून सुंदर-सुंदर अशी वाक्ये तयार झालीत.
अशा याच सुंदर मराठी भाषेतील मराठी बाराखडी चा आपण या लेखात सखोल लेखा-जोखा म्हणजेच अभ्यास करणार आहोत

मराठी बाराखडी ची रचना ही पुढीलप्रमाणे होते.
- मराठीच्या कोणत्याही व्यंजनामध्ये अ हा स्वर मिळविल्यास व्यंजनाक्षराच्या रूपामध्ये बदल होत नाही.व्यंजनाक्षराचे मूळ रूप हेच अकारयुक्त म्हणतो.
- मराठीच्या कोणत्याही व्यंजनामध्ये आ हा स्वर मिळविण्यासाठी ा हे चिन्ह वापरले जाते याला आपण काना म्हणतो.
- मराठीच्या कोणत्याही व्यंजनामध्ये इ हा स्वर मिळविण्यासाठी ि हे चिन्ह वापरले जाते याला ऱ्हस्व इकार किव्हा पहिली वेलांटी म्हणतो.
- मराठीच्या कोणत्याही व्यंजनामध्ये ई हा स्वर मिळविण्यासाठी ी हे चिन्ह वापरले जाते याला आपण दीर्घ इकार किव्हा दुसरी वेलांटी म्हणतो.
- मराठीच्या कोणत्याही व्यंजनामध्ये उ हा स्वर मिळविण्यासाठी ु हे चिन्ह वापरले जाते याला ऱ्हस्व उकार किव्हा पहिला उकार म्हणतो.
- मराठीच्या कोणत्याही व्यंजनामध्ये ऊ हा स्वर मिळविण्यासाठी ू हे चिन्ह वापरले जाते याला आपण दीर्घ उकार किव्हा दुसरा उकार म्हणतो.
- मराठीच्या कोणत्याही व्यंजनामध्ये ए हा स्वर मिळविण्यासाठी े हे चिन्ह वापरले जाते याला आपण मात्रा किव्हा एक मात्रा म्हणतो.
- मराठीच्या कोणत्याही व्यंजनामध्ये ऐ हा स्वर मिळविण्यासाठी ै हे चिन्ह वापरले जाते याला आपण दोन मात्रा म्हणतो.
- मराठीच्या कोणत्याही व्यंजनामध्ये ओ हा स्वर मिळविण्यासाठी ो हे चिन्ह वापरले जाते याला आपण एक काना व एक मात्रा किव्हा ओकार म्हणतो.
- मराठीच्या कोणत्याही व्यंजनामध्ये औ हा स्वर मिळविण्यासाठी ौ हे चिन्ह वापरले जाते याला आपण एक काना व दोन मात्रा किव्हा औकार म्हणतो.
- मराठीच्या कोणत्याही व्यंजनामध्ये अं हा स्वर मिळविण्यासाठी ं हे चिन्ह वापरले जाते याला आपण अनुस्वार किव्हा टिंब किव्हा शिरोबिंदू म्हणतो..
- मराठीच्या कोणत्याही व्यंजनामध्ये अः हा स्वर मिळविण्यासाठी ः हे चिन्ह वापरले जाते याला आपण विसर्ग म्हणतो.
marathi barakhadi chart with pictures.
मराठी स्वर व्यंजने चित्रासह

Marathi Barakhadi | मराठी बाराखडी
अ चा उच्चार बाराखडी चार्ट |
कोणत्याही व्यंजनामध्ये अ हा स्वर मिळविल्यास व्यंजनाक्षराच्या रूपामध्ये बदल होत नाही.व्यंजनाक्षराचे मूळ रूप हेच अकारयुक्त म्हणतो.
व्यंजनामध्ये अ हा स्वर मिळविण्यास याचा उच्चार क्+अ=क असा होतो.
क, ख, ग, घ, च… असे वाचन करतात.
क | ख | ग | घ | च |
छ | ज | झ | ट | ठ |
ड | ढ | ण | त | थ |
द | ध | न | प | फ |
ब | भ | म | य | र |
ल | व | श | ष | स |
ह | ळ | क्ष | ज्ञ |
आ चा उच्चार बाराखडी चार्ट |
कोणत्याही व्यंजनामध्ये आ हा स्वर मिळविण्यास याचा उच्चार क्+आ=का असा होतो.
का, खा, गा, घा, चा असे वाचन करतात.
व्यंजनामध्ये आ हा स्वर मिळविण्यासाठी ा हे चिन्ह वापरले जाते याला काना म्हणतात.
याचा उच्चार क ला काना का, ख ला काना खा असा होतो.
का | खा | गा | घा | चा |
छा | जा | झा | टा | ठा |
डा | ढा | णा | ता | था |
दा | धा | ना | पा | फा |
बा | भा | मा | या | रा |
ला | वा | शा | षा | सा |
हा | ळा | क्षा | ज्ञा |
इ चा उच्चार बाराखडी चार्ट |
कोणत्याही व्यंजनामध्ये इ हा स्वर मिळविण्यास याचा उच्चार क्+इ=कि असा होतो.
कि,खि,गि,घि,चि…असे वाचन करतात.
व्यंजनामध्ये इ हा स्वर मिळविण्यासाठी ि हे चिन्ह वापरले जाते याला र्हस्व वेलांटी किव्हा पहिली वेलांटी म्हणतात.
याचा उच्चार क ला पहिली वेलांटी कि, ख ला पहिली वेलांटी खि असा होतो.
कि | खि | गि | घि | चि |
छि | जि | झि | टि | ठि |
डि | ढि | णि | ति | थी |
दि | धि | नि | पि | फि |
बि | भि | मि | यि | रि |
लि | वि | शि | षि | सि |
हि | ळि | क्षि | ज्ञि |
ई चा उच्चार बाराखडी चार्ट |
कोणत्याही व्यंजनामध्ये ई हा स्वर मिळविण्यास याचा उच्चार क्+ई=कीअसा होतो.
की,खी,गी,घी,ची असे वाचन करतात.
व्यंजनामध्ये ई हा स्वर मिळविण्यासाठी ी हे चिन्ह वापरले जाते दुसरी वेलांटी म्हणतात.
याचा उच्चार क ला दुसरी वेलांटी की, ख ला दुसरी वेलांटी खी असा होतो.
की | खी | गी | घी | ची |
छी | जी | झी | टी | ठी |
डी | ढी | णी | ती | थी |
दी | धी | नी | पी | फी |
बी | भी | मी | यी | री |
ली | वी | शी | षी | सी |
ही | ळी | क्षी | ज्ञी |
उ चा उच्चार बाराखडी चार्ट |
कोणत्याही व्यंजनामध्ये उ हा स्वर मिळविण्यास याचा उच्चार क्+उ=कु असा होतो.
कु,खु,गु,घु,चू असे वाचन करतात.
व्यंजनामध्ये उ हा स्वर मिळविण्यासाठी ु हे चिन्ह वापरले जाते याला पहिला उकार म्हणतात.
याचा उच्चार क ला पहिला उकार कु, ख लापहिला उकार खु असा होतो.
कु | खु | गु | घु | चु |
छु | जु | झु | टु | ठु |
डु | ढु | णु | तु | थु |
दु | धु | नु | पु | फु |
बु | भु | मु | यु | रु |
लु | वु | शु | षु | सु |
हु | ळु | क्षु | ज्ञु |
ऊ चा उच्चार बाराखडी चार्ट |
कोणत्याही व्यंजनामध्ये ऊ हा स्वर मिळविण्यास याचा उच्चार क्+ऊ=कू असा होतो.
कू,खू,गू,घू,चू चा असे वाचन करतात.
व्यंजनामध्ये ऊ हा स्वर मिळविण्यासाठी ू हे चिन्ह वापरले जाते याला दुसरा उकार म्हणतात.
याचा उच्चार क ला दुसरा उकार कू, ख ला दुसरा उकार खू असा होतो.
कू | खू | गू | घू | चू |
छू | जू | झू | टू | ठू |
डू | ढू | णू | तू | थू |
दू | धू | नू | पू | फू |
बू | भू | मू | यू | रू |
लू | वू | शू | षू | सू |
हू | ळू | क्षू | ज्ञू |
ए चा उच्चार बाराखडी चार्ट |
कोणत्याही व्यंजनामध्ये ए हा स्वर मिळविण्यास याचा उच्चार क्+ए=के असा होतो.
के,खे,गे,घे,चे असे वाचन करतात.
व्यंजनामध्ये ए हा स्वर मिळविण्यासाठी ए हा स्वर मिळविण्यासाठी े हे चिन्ह वापरले जाते एक मात्रा म्हणतात.
याचा उच्चार क ला एक मात्रा के, ख ला एक मात्रा खे असा होतो.
के | खे | गे | घे | चे |
छे | जे | झे | टे | ठे |
डे | ढे | णे | ते | थे |
दे | धे | ने | पे | फे |
बे | भे | मे | ये | रे |
ले | वे | शे | षे | से |
हे | ळे | क्षे | ज्ञे |
ऐ चा उच्चार बाराखडी चार्ट |
कोणत्याही व्यंजनामध्ये ऐ हा स्वर मिळविण्यास याचा उच्चार क्+ऐ=कै असा होतो.
कै,खै,गै,घै,चै असे वाचन करतात.
व्यंजनामध्ये ऐ हा स्वर मिळविण्यासाठी ै हे चिन्ह वापरले जाते याला दोन मात्रा म्हणतात.
याचा उच्चार क ला दोन मात्रा कै, ख ला दोन मात्रा खै असा होतो.
कै | खै | गै | घै | चै |
छै | जै | झै | टै | ठै |
डै | ढै | णै | तै | थै |
दै | धै | नै | पै | फै |
बै | भै | मै | यै | रै |
लै | वै | शै | षै | सै |
है | ळै | क्षै | ज्ञै |
ओ चा उच्चार बाराखडी चार्ट |
कोणत्याही व्यंजनामध्ये ओ हा स्वर मिळविण्यास याचा उच्चार क्+ओ=को असा होतो.
को,खो,गो,घो,चो असे वाचन करतात.
व्यंजनामध्ये ओ हा स्वर मिळविण्यासाठी ो हे चिन्ह वापरले जाते याला ओकार म्हणतात.
याचा उच्चार क ला ओकार को, ख ला ओकार खो असा होतो.
को | खो | गो | घो | चो |
छो | जो | झो | टो | ठो |
डो | ढो | णो | तो | थो |
दो | धो | नो | पो | फो |
बो | भो | मो | यो | रो |
लो | वो | शो | षो | सो |
हो | ळो | क्षो | ज्ञो |
औ चा उच्चार बाराखडी चार्ट |
कोणत्याही व्यंजनामध्ये औ हा स्वर मिळविण्यास याचा उच्चार क्+औ=कौ असा होतो.
कौ,खौ,गौ,घौ,चौ असे वाचन करतात.
व्यंजनामध्ये औ हा स्वर मिळविण्यासाठी ौ हे चिन्ह वापरले जाते याला आपण औकार म्हणतात.
याचा उच्चार क ला औकार कौ, ख ला औकार खौ असा होतो.
कौ | खौ | गौ | घौ | चौ |
छौ | जौ | झौ | टौ | ठौ |
डौ | ढौ | णौ | तौ | थौ |
दौ | धौ | नौ | पौ | फौ |
बौ | भौ | मौ | यौ | रौ |
लौ | वौ | शौ | षौ | सौ |
हौ | ळौ | क्षौ | ज्ञौ |
अं चा उच्चार बाराखडी चार्ट |
कोणत्याही व्यंजनामध्ये अं हा स्वर मिळविण्यास याचा उच्चार क्+अं=कं असा होतो.
कं,खं,ग,घं,चं असे वाचन करतात.
व्यंजनामध्ये अं हा स्वर मिळविण्यासाठी ं हे चिन्ह वापरले जाते याला आपण अनुस्वार म्हणतात.
याचा उच्चार क ला अनुस्वार कं, ख ला अनुस्वार खं असा होतो.
कं | खं | गं | घं | चं |
छं | जं | झं | टं | ठं |
डं | ढं | णं | तं | थं |
दं | धं | नं | पं | फं |
बं | भं | मं | यं | रं |
लं | वं | शं | षं | सं |
हं | ळं | क्षं | ज्ञं |
अः चा उच्चार बाराखडी चार्ट |
कोणत्याही व्यंजनामध्ये अः हा स्वर मिळविण्यास याचा उच्चार क्+अः=क: असा होतो.
का, खा, गा, घा, चा असे वाचन करतात.
व्यंजनामध्ये अ: हा स्वर मिळविण्यासाठी ः हे चिन्ह वापरले जाते याला विसर्ग म्हणतात.
याचा उच्चार क ला विसर्ग क:, ख ला विसर्ग ख: असा होतो.
कः | खः | गः | घः | चः |
छः | जः | झः | टः | ठः |
डः | ढः | णः | तः | थः |
दः | धः | नः | पः | फः |
बः | भः | मः | यः | रः |
लः | वः | शः | षः | सः |
हः | ळः | क्षः | ज्ञः |
Download Marathi Barakhadi Chart PDF
Marathi Barakhadi | मराठी बाराखडी | वाचन पुस्तिका PDF
Name | मराठी बाराखडी वाचन चार्ट |
File Format | |
File Size | 707KB |
Required Software | Any PDF Readers |
मराठी मुळाक्षरे शिकण्यासाठी व्हिडिओ
FAQ | मराठी बाराखडी व वर्णमाला संदर्भात नेहमी विचारले जाणारे प्रश्न
Q. प्रश्न – मराठी बाराखडी (12 खडी) म्हणजे काय? | Marathi Barakhadi mhanje kay?
A. उत्तर – मराठी बाराखडी (12 खडी) म्हणजे एका वर्णाला १२ वेगवेगळी चिन्हे किव्हा खुणा जोडून जो वर्ण (उच्चार) तयार होतो त्याला बाराखडी (12 खडी) असे म्हणतो .मराठी वर्णमालेत अ पासून ते औ पर्यंतच्या १२ वर्णांना स्वर म्हटले जाते. तर अं आणि अः याना स्वराधी म्हंटले जाते. सोबतच क पासून ते ळ पर्यंतच्या ३४ वर्णांना व्यंजने म्हंटले जाते. म्हणजेच या व्यंजनाला क ते ळ ला वेगवेळी १२ चिन्हे जोडली की जे उच्चार तयार होतात त्यास मराठी बाराखडी 12 khadi marathi असे म्हटले जाते
Q. प्रश्न – मराठी लिहायला कसे शिकायचे? Marathi lihayala kase shikayache?
A. उत्तर – मराठी लिहायला शिकण्याचा उत्तम मार्ग म्हणजे अक्षरे गिरविणे ही पहिली पायरी होय. मराठीत छापलेला कोणताही सुलभ मजकूर वारंवार लिहीण्याचा सराव करणे मराठी लिहायला शिकतांना गरजेचे आहे. मराठी वर्णमाला लेखनाचा उत्तम सराव करणे गरजेचे आहे. जसजसे तुमचे समजून लेखन सुधरत जाईल, तसतसे तुम्ही विविध उतारे, रंजक गोष्टी लिहिण्याच्या सरावाकडे वळू शकता.
Q. प्रश्न – मराठी वाचायला कसे शिकायचे Marathi vachayala kase shikayache?
A. उत्तर – मराठी वाचायला शिकण्याचा उत्तम मार्ग म्हणजे अक्षरे किव्हा वर्ण वाचणे ही पहिली पायरी होय. मराठीत छापलेला कोणताही सुलभ मजकूर वारंवार वाचण्याचा सराव करणे मराठी वाचायला शिकतांना गरजेचे आहे. मराठी वर्णमाला वाचनाचा उत्तम सराव करणे गरजेचे आहे. जसजसे तुमचे समजून वाचन सुधरत जाईल, तसतसे तुम्ही विविध उतारे,निबंध,पुस्तके,वृत्तपत्रे, गोष्टी वाचण्याच्या सरावाकडे वळू शकता.
Q. प्रश्न – मराठी मध्ये स्वर किती? | Marathi madhye swar kiti?
A. उत्तर – बारा (12)
Q. प्रश्न – मराठी मध्ये व्यंजने किती? Marathi madhye vyanjane kiti?
A. उत्तर – चौतीस (34)
Q. प्रश्न – मराठी मध्ये स्वराधी किती? | Marathi madhye swaradhi kiti?
A. उत्तर – दोन (2)
Q. प्रश्न – मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? | Marathi varnmalet ekun kiti varn ahet?
Q. प्रश्न – मराठी वर्णमालेत किती अक्षरे आहेत? | Marathi varnmalet kiti akshare ahet?
A. उत्तर – बारा स्वर (12) + चौतीस व्यंजने (34) + दोन स्वराधी (2) = अठ्ठेचाळीस (48) वर्ण /अक्षरे